
13 Mar सुवर्णप्राशन संस्कार (Suvarnaprashan Sanskar)
सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. मग ती स्पर्धा कशाचीही आणि कोणाचीही असू शकते; म्हणजेच पालकांची आपल्या मुलांसाठी एकमेकांशी किंवा मुलांची मुलांशी अश्या वेगवेगळ्या स्पर्धा निर्माण होतात. मुलांशी स्पर्धा करताना अकारण मुलांवर दडपण येते. या दडपणाला सामोरे जाण्यासाठी मानसिकरीत्या आणि शारीरिकरित्या…यासाठीच लहानपणापासून मुलांवर संस्कारांची गरज असते. आयुर्वेदामध्ये अगदी बाळ जन्मल्यापासून निरनिराळे संस्कार वर्णन केले आहेत. प्राचीन भारतीय शास्त्रात वर्णन केलेल्या १६ संस्कारांपैकी सुवर्णप्राशन हा एक संस्कार आहे. सुवर्णप्राशन हा आयुर्वेद शास्त्रानुसार बालकाच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठीचा महत्त्वाचा संस्कार आहे.
तसेच आजच्या जगात nuclear family ची संकल्पना रुजते आहे. त्यामुळे ‘’छोटे कुटूंब सुखी कुटुंब’ या संकल्पनेत एकाच मुलाकडून विविध क्षेत्रात विशेष यश मिळवण्याची अपेक्षा ठेवली जाते. भावी पिढी कर्तृत्ववान, हुशार, सर्वगुणसंपन्न होण्यासाठी प्रत्येक दाम्पत्य अपत्याची विशेष काळजी घेत असते. तसेच आजच्या काळात वापरला जाणारा निकृष्ट आहार व रासायनिक खतांचा वापर, वाढते प्रदूषण यामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी सुवर्णप्राशन हे अमृताप्रमाणे उपयोगी ठरते. म्हणूनच आयुर्वेदात वर्णन केलेला सुवर्णप्राशन संस्कार बालकांसाठी उपयोगी ठरतो.
आता हा सुवर्णप्राशन संस्कार म्हणजे नक्की काय तर प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्रावर सुवर्ण भस्म, गाईचे तूप व काही निवडक औषधी यांनी सिद्ध केलेले औषध बालकास दिले जाते. यासाठी बाळ जन्मल्यापासून ते वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत दिल्यास चांगला फायदा दिसून येतो.
सुवर्णप्राशन दिल्याने खालील फायदे होतात :
- रोगप्रतिकारक शक्ति वाढविते.
- बौद्धिक क्षमता वाढविते.
- पचनक्रिया सुधारते.
- ऋतुबदलामुळे होणाऱ्या रोगांपासून संरक्षण मिळते.
- वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या श्वसन विकारांविरुद्ध बल वाढते.
- सुकुमार कांति प्राप्त होते.
- स्मृति, धारणशक्ती, आकलन शक्ति इ. सुधारते.
सुवर्णप्राशनासाठीचे पुष्य नक्षत्रानुसार 2021 या वर्षातील दिनांक :
२८ जानेवारी, २५ फेब्रुवारी, २४ मार्च, २१ एप्रिल, १८ मे, १४ जून, ११ जुलै, ८ ऑगस्ट, ४ सप्टेंबर, १0 ऑक्टोबर, २५ नोव्हेंबर, २२ डिसेंबर
No Comments