
19 Jul रहस्य – लांब व निरोगी केसांचे
Silky, काळे, लांब व दाट केस कोणाला नको असतात!!
पण प्रत्येकाचे केस सारखे नसतात. व्यक्तिंच्या जेवढ्या भिन्न प्रकृति बघायला मिळतात तितकेच केस पण वेगवेगळ्या qualityचे बघायला मिळतात. त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर त्या केसांचे पोषण अवलंबून असते. बरेचदा खाणे पिणे योग्य असून सुद्धा केसांचे वेगवेगळे आजार होताना दिसतात. खरंतर नुसता चांगला आहार असण्याने केस चांगले टिकवता येतात असं नाही. हल्लीच्याधावपळीच्या काळात केस टिकवणं फारच अवघड होऊन बसलंय. म्हणून आपण बघतो हल्ली Salons/Beauty Parlors ची संख्या वाढत चालली आहे. पण या महागड्या मार्गांना जाण्या-अगोदर आपण बरेच घरातले उपचार पण करू शकतो ना!
आयुर्वेदात असे बरेच सोपे उपाय सांगून ठेवले आहेत. कदाचित हे उपाय तुम्हाला हल्लीच्या parlour व salons मधील उपचारांच्या विरुद्ध वाटतील. पण तरी ते उपाय केल्यास, अतिशय चांगला उपयोग झालेला मी माझ्या पेशंटमध्ये बघितला आहे. अर्थात या उपचारांसाठी सातत्य असावे लागते. Instant food सारखे instant बदल घडून येत नाहीत. यातीलच एक प्रमुख गोष्ट सांगितली आहे कि मानेवरील भागाला गार पाण्याने आंघोळ घालावी आणि मानेखाली गरम पाण्याने. आपल्या शिर भागातील सर्व अवयव मऊ, नाजूक व sensitive असतात. त्यांना गरम वस्तू/गरम पाण्याचा सतत संपर्क झाला तर त्यांच्या कार्यात अडथळा येऊ लागतो आणि हळूहळू त्यांचा ऱ्हास व्हायला लागतो. आता मानेच्या वर कोणते अवयव येतात हे मी सांगायला नकोच !!! गरम पाण्याऐवजी आपण गार पाण्याने आंघोळ केल्यास शिर भागाचे आघातांपासून रक्षण होते. तसेच केसांची मुळे घट्ट होतात.
उन्हाळ्यात सुद्धा उन्हात फिरताना टोपी/स्कार्फ/वापरणं खूप गरजेचे आहे. उष्णतेपासून केसांचे रक्षण आवश्यक आहे. माझे सासरे नेहमी सांगत असतात कि त्यांच्या मिलिटरी ट्रेनिंग मध्ये सिर ठंडा और पैर गरम हे सांगत असायचे. या वाक्याचा सुद्धा उपयोग आपल्याला केसांची निगा ठेवण्यास आहे. जेवढे डोके विचारांमुळे, तापट स्वभावामुळे किंवा टेन्शन मुळे गरम राहील तेवढे केस लवकर
नाश पावतील. डोक्याचा भाग हा नेहमी थंडच ठेवणे अपेक्षित आहे. हिवाळ्याच्या सिझन मध्ये कदाचित थंड पाण्याचा वापर करणे अवघड होईल. अशावेळी केसांवरील आंघोळ करताना शेवटचा तांब्या हा गार पाण्याचा ओतावा, म्हणजे वाढलेली उष्णता कमी होईल आणि केस टिकवता येतील.
हे सगळं वाचल्यावर तुम्हाला नक्केच कळेल की आयुर्वेदामुळे किती सोप्या पद्धतीने केस टिकवायला सल्ला दिला आहे. असेच छोटे छोटे उपाय घेऊन पुन्हा भेटेन. आपल्याला लेख आवडल्यास नक्की शेअर करा …
No Comments