
05 Apr आयुर्वेदीय मसाला
एखाद्या पदार्थाचा सुगंध घरात दरवळला की तोंडाला पाणी सुटते व तो पदार्थ खाण्याची इच्छा होते. जोरात भूक लागते. हा सुगंध त्या पदार्थांमध्ये घातलेल्या मसाल्यांमुळे आलेला असतो. त्या पदार्थाची चव/चमचमीतपणा देखील मसाल्यांनी येते. म्हणून बाजारात अनेक प्रकारचे मसाले उपलब्ध आहेत. परंतु या मसाल्याचा वापर अतिप्रमाणात केल्याने त्याचा दुष्परिणामच दिसतो. आजकाल सर्व वयोगटातील माणसांमध्ये जळजळ, उलट्या होणे, डोकेदुखी, चक्कर वगैरे आजार
सरसकट बघायला मिळतात. अशा तक्रारी वारंवार होत असतील तर या मसाल्यांचा उपयोगच काय? म्हणून मसालेदार पदार्थ न खाण्याचा सल्ला पेशंटना दिला जातो.
भारतीय पदार्थांचे जगात जे वेगळेपण आहे ते मसाल्यांमुळेच. कारण पाश्चात्य देशांमध्ये bland असा आहार घेतला जातो. म्हणूनच त्या लोकांना सतत मलावरोधाची (constipation) तक्रार असते. आणि त्या अनुषंगाने इतर आजार होतात. म्हणजेच फार पूर्वीपासून आपल्या संस्कृतीमध्ये मसाल्यांचा योग्य वापर केलेला दिसून येतो. पण पूर्वीच्या काळी हे मसाले घरी तयार केले जात. आता बाजारात मिळणाऱ्या मसाल्यांमध्ये तिखटपणा जास्त असतो, तसेच भाज्यांना रंग येण्यासाठी काही प्रमाणात रंग मिसळलेला असतो व Preservatives देखील घातलेली असतात.
मसाल्याचा उपयोग पदार्थांमध्ये करण्याचा हेतुच हा असतो की त्या अन्नाचे पचन व्यवस्थित व्हावे. अन्न पचविण्यासाठी जो अग्नि हवा असतो तो पण योग्य प्रमाणात तयार व्हावा. या सर्व गोष्टींचा विचार करुनच आयुर्वेदीय ग्रंथामध्ये विविध मसाल्यांचा उल्लेख आला आहे. विविध प्रकारच्या आजारांमध्ये हा मसाला वापरल्यास त्याचा फायदा होतो. सध्या लोकांची life style इतकी बदलली आहे की Shift duty, busy schedule यामुळे त्यांच्या जेवणाच्या वेळा खूपच अनियमित
होतात. व या सर्वांचा परिणाम म्हणून पचनाच्या तक्रारी, पोट फुगणे, गॅसेस होणे, पोट दुखणे कधी मलबद्धता तर कधी जुलाब होणे म्हणजेच पोट बिघडण्याच्या तक्रारी , IBS सारखे आजार बघायला मिळतात. या सर्वांवर उपाय म्हणजे हे आयुर्वेदीय मसाले.
कृमिरोगामध्ये (जंत होणे ) आबाल वृद्धांपर्यंत सर्वांना स्वच्छता न पाळणे, सतत बाहेरचे पदार्थ खाणे यामुळे जंत होण्याची तक्रार होत असते. आयुर्वेदीय मसाल्यातील घटकांमुळे अशा सर्व कृमींचा सुद्धा नायनाट होण्यास मदत होते.
लहान मुलांना किंवा मोठ्यांना पण जेव्हा ताप येतो तेव्हा तोंडाला चव नसते. काही खावेसे वाटत नाही. अशावेळी भातामध्ये तूप व आयुर्वेदीय मसाला (मेतकूटाप्रमाणे) घातला तर तोंडाला चांगली चव येते व खाण्याची इच्छा होते.
कधी कधी चमचमीत खाण्याची इच्छा होते पण असे पदार्थ खाल्ले की त्रास होतो. अशावेळी आयुर्वेदिक मसाला वापरून पदार्थ केला तर तो पदार्थ चविष्ट पण होतो व त्याचा त्रासही होत नाही.
सर्दी, सततचा खोकला, दमा, हवामान बदलाचे होणारे त्रास असलेल्यांना जर त्यांच्या जेवणात या मसाल्याचा वापर करून पदार्थ खाण्यास दिले तर जो कफ या व्याधींना कारणीभूत असतो तो कमी होण्यास मदत होते.
विविध प्रकारचे वातव्याधी, संधिवात, मानेचे व मणक्याचे आजार या सारख्या आजारांमध्ये वाताचे प्रमाण कमी करून वेदना कमी करण्यासाठी आयुर्वेदिक मसाल्याची मदत होते. थायरॉईड, मधुमेह, लठ्ठपणा (obesity), हृद्रोग यासारख्या मोठ्या मोठ्या आजारांची सुरुवात ही पचनशक्ती कमी असल्याने होते. योग्य प्रमाणात स्रावांची निर्मिती होत नाही व थायरॉईड सारखे अवयव त्यांचे काम नीट करू शकत नाहीत. आजकालचे जंक फूड, अतिगोड, तळलेले पदार्थ जास्त खाणे, दुधाच्या पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन यामुळे सुद्धा अनेक आजार होतात. अशा वेळेस आयुर्वेदिक मसाल्याचा जेवणात वापर केल्याने पचनशक्ती सुधारून स्रावांची योग्य प्रमाणात निर्मिती होते.
त्वचेचे विविध आजार उदा; Pimples, Eczema, Psoriasis या सर्वांचे मूळ हे विरुद्ध अन्नात आहे. विरुद्ध अन्न म्हणजे असे पदार्थ की ज्यामध्ये २-३ विरुद्ध गुणांचे पदार्थ एकत्र केले जातात. उदा; केळ्याचे शिकरण, फ्रुट सॅलड , पनीरची भाजी वगैरे. शक्यतो वरील पदार्थ खाऊ नयेत. परंतु जर कधी असे पदार्थ म्हणजे पनीरची भाजी वगैरे खाण्यात आले तर आयुर्वेदिक मसाल्याचा वापर जेवणात जरूर करावा. यामुळे अशा पदार्थांचा वाईट परिणाम कमी होण्यास मदत होईल.
असे सगळे विचार मांडत असताना असे लक्षात आले की असा एखादा ग्रंथात सांगितलेला मसाला आपण पेशंट ना तयार करून द्यावा. हा मसाला क्लिनिक मध्ये उपलब्ध आहे. या मसाल्यात कोणतेही preservatives आणि रंग घातलेले नाहीत हेच याचे वैशिष्ट्य आहे.
डॉ. मधुरा भिडे
(एम. डी .(आयुर्वेद ))
No Comments