
01 Jun उत्तम रोगप्रतिकारक शक्तीसाठी…
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी बाळाच्या जन्मापासूनच काळजी घेणे आवश्यक आहे. जन्मापासून म्हणण्यापेक्षा गर्भधारण झाल्यापासूनच आयुर्वेदाची साथ महत्त्वाची ठरू शकते. आयुर्वेदात सांगितलेले छोटे-छोटे उपाय बाळाचे शारीरिक, बौद्धिक व मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात.
त्यापैकीच एक उपचार (संस्कार) म्हणजे सुवर्णप्राशन संस्कार होय. हा संस्कार बाळाच्या जन्मापासून ते वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत केला जातो. सुवर्णप्राशन संस्कार केल्याने बाळाची बौद्धिक व शारीरिक वाढ तर चांगली होतेच पण त्याबरोबर रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. आयुर्वेदाच्या दृष्टीने सोने हे असे औषध आहे ज्याने शरीरातील toxins (विषारी घटक) किंवा वेगवेगळे जंतु जे शरीराला त्रास देऊ शकतात त्यांचा नाश करते. तसेच सध्या रासायनिक खतांचा अतिवापर, preservative असलेले अन्न यांचा वापर अति होतो आहे. यांचाही दुष्परिणाम घालविण्यासाठी सुवर्ण प्राशनाचा फायदा नक्कीच होतो. त्याचबरोबर जे काही अन्न बाळ जेवणार आहे; त्याचा दुप्पट फायदा करून देते. शास्त्रीय भाषेत म्हणायचंच झालं तर ‘सुवर्ण (Gold) acts as a catalyst. ‘
माझ्याकडे असाच एक दोन-अडीच वर्षाचा लहान मुलगा सर्दीचा खूप त्रास होतो म्हणून त्याचे आईवडील माझ्याकडे त्याला घेऊन आले होते. आणि या सर्दीच्या त्रासामुळे तो जेवत ही नव्हता. दूध दिले तरी खोकल्यातून उलटून पडत होते. म्हणून मी काही औषधे दिली व सुवर्णप्राशन करून घेण्यास सांगितले. पहिल्याच सुवर्णप्राशनाबरोबर त्याच्या उलट्या थांबल्या. कारण मी दिलेल्या औषधांचा सुवर्णामुळे दुप्पट फायदा झाला. हळूहळू भूक वाढायला लागली आणि ३ महिन्यानंतर सर्दी होणं पूर्ण थांबले. आज तो साडेचार वर्षाचा झाला आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारचा आजार झालेला नाही. असाच सगळ्या लहान मुलांना फायदा व्हावा यासाठी हा लेख प्रपंच …
डॉ. मधुरा भिडे
No Comments