
19 Jun त्रिफळा चूर्ण
वर्षानुवर्ष आपल्या शरीराच्या कोणत्याही समस्येसाठी योग्य उपचार हे आयुर्वेदात (Ayurveda) सापडतात. आपली बदलती लाईफस्टाईल आणि रोजचा थकवा यामुळे अनेक आजार शरीरामध्ये आपलं घर बनवतात . पण आपण वेळीच आपल्या शरीराची काळजी घेतली तर तुम्ही या रोजच्या समस्यांपासून नक्कीच सुटका मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला साधारण 2000 वर्षोंपासून अस्तित्वात असणाऱ्या त्रिफळाचा (Triphala) वापर करता येईल.
त्रिफळा म्हणजे त्रि + फल (फळ) म्हणजेच हिरडा, बेहडा व आवळा या तीनही फळांचे शास्त्रोक्त प्रमाणानुसार एकत्रित केलेले चूर्ण. त्रिफळा चूर्ण एक ‘आयुर्वेदिक चूर्ण’ जे नुसते पोट साफ होण्यासाठी उपयुक्त असे नाही तर बहुगुण युक्त असे चूर्ण आहे .आयुर्वेदातील एक अत्यंत उत्कृष्ट आणि उपयुक्त असं त्रिफळा असून याच्या फायद्याची यादी ही खूपच मोठी आहे. आवळा, बेहड़ा आणि हिरडा या तीन वेगवेगळ्या वनस्पतींनी तयार करण्यात आलेलं त्रिफळा चूर्ण (Triphala Churna) हे बऱ्याच आजारांवर उपयुक्त असल्याचं मानलं जातं.
त्रिफळा चूर्णाचे काही महत्त्वाचे फायदे खालील प्रमाणे :
१) त्रिफळा चूर्ण मेटाबॉलिज्म (metabolism) व्यवस्थित राखून वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. तसेच ज्यांना खूप काळापासून मलावष्टंभाची (Constipation) तक्रार आहे, त्यांनी रात्री झोपताना शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेले एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यातून घेतल्यास ही तक्रार दूर होण्यास मदत होते.
२) त्रिफळा चूर्ण खाल्ल्याने डोळ्यांचे बरेच आजार बरे होतात आणि यामुळे तुमच्या दृष्टीमध्येदेखील सुधारणा होते. त्रिफळा चूर्णानेदेखील डोळे चांगले राहतात. तसंच डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठीही याचा उपयोग होतो.
३) त्रिफळा चूर्ण रोज सकाळी घेतल्याने रसायन कार्य (Anti-ageing)दिसून येते. यामधील आवळ्याच्या योग्य प्रमाणामुळे त्वचेला सुरकुत्या लवकर पडत नाही व केस लवकर पांढरे होत नाहीत.
४) मधुमेहाने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी त्रिफळाचूर्ण अमृताप्रमाणे कार्य करते .
५) त्रिफळा चूर्णाने त्वचेसंबंधी अनेक समस्यांवर उपचार करता येतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते. त्वचेवरील डेड स्किन घालवून तुमच्या शरीरावरील छिद्र आणि रक्त स्वच्छ करण्यासाठी याची मदत होते.
६) सध्या लहान मुलं देखील खूप प्रमाणात mobile व computers चा वापर करताना दिसतात. त्यामुळे चष्मा लवकर लागतो. जर त्रिफळा चूर्ण मधासह लहान मुलांना दिले तर दृष्टी सुधारते व Immunity देखील वाढते.
७) त्रिफळा चूर्णातील महत्त्वाचा घटक म्हणजे आवळा जो Vitamin C ने युक्त आहे त्यामुळे Immunity वाढवण्यासाठी या चूर्णाचा खूप फायदा होतो.
८) सांधेदुखी, कंबरदुखी असा त्रास होणाऱ्यांसाठी त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यातून घेतल्याने फायदा होताना दिसून येतो.
९) बाह्यतः देखील त्रिफळा चूर्णाचा फायदा होतो. कोमट पाण्यात त्रिफळा चूर्ण घालून त्याने केस धुतल्याने कोंडा कमी होतो व केसांची वाढ चांगली होते.
१०) त्रिफळा चूर्णाचा दंतमंजन सारखा देखील उपयोग होतो. रात्री झोपताना त्रिफळा चूर्णाने हिरड्यांना हळुवार मसाज केल्याने हिरड्या मजबूत होतात.
त्रिफळा चूर्ण जनरल डीटॉक्सकरता कोणीही घेऊ शकतं हा समज योग्य आहे ना? ते दररोज घेतलं तर चालतं का? किती प्रमाणात? कधी? कसं?
थोडक्यात त्रिफळा चूर्ण घेण्याची योग्य पद्धती काय आहे? रिकाम्या पोटीच घ्यावं का? त्रिफळा चूर्णाचे नक्की फायदे काय आहेत?
या आणि अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी संपर्क साधा
डॉ. मधुरा भिडे
8380016116
www.recovalife.com
[ त्रिफळा चूर्णाचे वरील सर्व फायदे प्राप्त होण्यासाठी त्याची क्वालिटी उत्तम आणि खात्रीशीर असणे आवश्यक आहे.
अनघा जलतारे
Posted at 04:57h, 30 Septemberनमस्कार,
माझा मुलगा 20 वर्षांचा असून गेल्या 2 वर्षात त्याचे केस झपाट्याने गळून निम्मे राहिलेत. त्याच्या आजोबांना टक्कल होते तसेच बाबा व काकांचे केसही कमीच राहिलेत. साधारण ह्याच वयात त्यांचेही केस गळायला लागले होते असे त्यांचे म्हणणे आहे. आनुवंशिकता म्हणून हा प्रश्न सोडून द्यायला पाहिजे का? की इलाज करून ही फेज पुढे ढकलता येईल?
Madhura Bhide
Posted at 08:53h, 10 NovemberYou can contact us on 8380016116 for detail information.
अनघा राजेश जलतारे
Posted at 04:57h, 30 Septemberनमस्कार,
माझा मुलगा 20 वर्षांचा असून गेल्या 2 वर्षात त्याचे केस झपाट्याने गळून निम्मे राहिलेत. त्याच्या आजोबांना टक्कल होते तसेच बाबा व काकांचे केसही कमीच राहिलेत. साधारण ह्याच वयात त्यांचेही केस गळायला लागले होते असे त्यांचे म्हणणे आहे. आनुवंशिकता म्हणून हा प्रश्न सोडून द्यायला पाहिजे का? की इलाज करून ही फेज पुढे ढकलता येईल?
Madhura Bhide
Posted at 08:59h, 26 OctoberHello, you can contact us on 8380016116 for more information.