
16 Dec सूर्यनमस्कार
आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने ।
जन्मान्तर सहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते ।।
जे दररोज नियमितपणे सूर्य नमस्कारांचा सराव करतील त्यांनां हजार जन्म दारिद्र्य येत नाही म्हणजेच काही कमी पडत नाही, अशा अर्थाचा हा श्र्लोक आहे. म्हणजेच रोजच्या सरावाने मनुष्यास शारिरीक व मानसिक ऊर्जा प्राप्त होऊन तो सतत कार्यमग्न राहतो व सुखी आयुष्य व्यतीत करतो असा बोध आपण घेऊ शकतो.
योगासनात सूर्यनमस्काराला सर्वश्रेष्ठ आसन मानले जाते कारण यामध्ये जवळपास सर्वच आसनांचा समावेश आहे. अगदी मानेपासून ते तळपायापर्यंत प्रत्येक सांध्यांची हालचाल यात समाविष्ट आहे व म्हणूनच रोज नियमित सूर्यनमस्कार घातल्याने सर्व शरीराला परिपूर्ण असा व्यायाम मिळतो. सूर्यनमस्कार नियमित केल्याने शरीर सुडौल, निरोगी व तेजस्वी होते. एकदा व्यवस्थित तंत्रशुद्ध पद्धतीने सुर्यनमस्कार घालणे शिकून घेतले की नंतर तुम्ही घरच्याघरी नियमित सूर्यनमस्काराचा सराव करू शकता.
- सूर्यनमस्कार सर्वांसाठीच फायदेशीर आहे.
- सूर्यनमस्कार नियमित घातल्याने पोटाची चरबी ज्याला आपण सेंट्रल ओबेसिटी म्हणतो ती कमी होण्यास खूपच मदत होते.
- हृदय व रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता वाढते.
- फुफुसांची ऑक्सिजन कॅरिंग कॅपसिटी वाढते. स्टॅमिना वाढतो व शरीराचा जडपणा आणि मरगळ दूर होते.
- मन शांत होते आणि चांगली झोप लागते.
- पोट साफ न होणे, गॅसेस होणे, पित्ताचा वारंवार त्रास होणे या सारख्या तक्रारी कमी होतात.
- सूर्यनमस्कार नियमित केल्याने केसांच्या मुळांशी आणि स्काल्पच्या ठिकाणी रक्तपुरवठा सुधारतो. त्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. तसेच स्काल्पचे पोषण होऊन केस पांढरे होण्याचे प्रमाण कमी होते.
- सूर्यनमस्कार केल्याने पचनक्रिया सुधारते आणि चयापचय क्रिया नियमित करून रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
- तसेच शरीरातील विषारे (toxins) बाहेर टाकण्यास मदत करते. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त वजन कमी करण्यास मदत करते.
- त्वचेला कांती प्राप्त होते. तसेच त्वचेला सुरकुत्या लवकर पडत नाहीत तारुण्य टिकून राहते.
सूर्यनमस्काराचे वरील सर्व फायदे मिळविण्यासाठी मात्र तांत्रिक पद्धतीने नमस्कार कसे घालायचे हे शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण सहसा 4/5 नमस्कार उत्साहाच्या भरात अगदी व्यवस्थित घातले जातात पण नंतर जसजशी संख्या वाढत जाईल तसतशी धाप लागायला लागते व 9/10 नमस्कारांच्या पुढे जाणे अशक्य होऊन बसते. काहींना तर अगदी 3/4 नमस्कारातच धाप लागते. त्याचे कारण म्हणजे नमस्कार घालताना श्वास कधी घ्यायचा, कधी सोडायचा व कधी रोखून धरायचा याचे एक तंत्र आहे व ते शिकून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
श्वासावर नियंत्रण ठेऊन सूर्यनमस्कार घातल्यास हळूहळू सरावाने तुम्ही कुठल्याही प्रकारची धाप न लागता अगदी व्यवस्थित 25/30 नमस्कार सहज घालू शकता. कुणी 50 /100 सूर्यनमस्कार घातलेले आपण ऐकतो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते की हे कसे शक्य आहे ? पण रोजच्या सरावाने व मुख्य म्हणजे काटेकोरपणे श्वसन तंत्र सांभाळून जेव्हा नमस्कार घातले जातात तेव्हा हे सहज शक्य होते.
सूर्यनमस्काराचे फायदे मिळविण्याकरिता रोज किमान 12 ते 24 यामध्ये जमेल तेवढे नमस्कार अतिशय नियमित घालणे आवश्यक आहे. बीजमंत्राबरोबर नमस्कार घातल्यास सूर्यनमस्काराचे पूर्णतः फायदे मिळतात. बीजमंत्रासाहित नमस्कार घातल्यास शरीराबरोबरच मानसिक पातळीवरही त्याचे फायदे होतात.
सूर्यदेवता जी सर्व विश्वाला ऊर्जा द्यायचे काम करते त्याप्रति कृतज्ञ भाव व्यक्त होतो. व्यायामाबरोबर उपासनाही होते. दोन नमस्कारांच्या मध्ये मंत्रोच्चारण केल्यास श्वासावर नियंत्रण मिळवून पुढचा नमस्कार व्यवस्थित घालता येतो. मंत्रोच्चारामुळे एकाग्रता वाढते व स्मरणशक्तीचा विलक्षण विकास होतो. सूर्यनमस्काराच्या नियमित सरावाने आत्मिक, मानसिक व शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होते.
आमच्या क्लिनिक मध्ये अश्या प्रकारे अत्यंत तांत्रिक दृष्ट्या शरस्त्रशुद्ध पद्धतीने सूर्यनमस्कार शिकवले जातात. प्रत्येकाला स्वतंत्रपणे वेळ देऊन नमस्कार शिकविले जातात.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर वर कॉल करा.
डॉ. मधुरा अ. भिडे.
(एम.डी आयुर्वेद)
www.recovalife.com
8380016116
Mrs Ashwini Anant Bakare
Posted at 07:54h, 19 DecemberThank you for your guidance.