
13 Nov सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः |
National Ayurveda Day on Dhanvantari Jayanti (धनत्रयोदशी)
आजार होऊ नये आणि स्वास्थ्य कसे टिकवावे हे आयुर्वेदाचे प्रयोजन आहे. (स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं, आतुरस्य विकार प्रशमनम् | )
सरकारने आयुर्वेदाबद्दल जनमाणसांमध्ये जागरूकता यावी म्हणून हा दिवस साजरा करायचे ठरवले.
आपण सगळे आज जागतिक संकटाला तोंड देत आहोत. यात महत्त्वाचे म्हणजे कोरोना व्हायरसला तोंड देण्यासाठी आपली तब्येत छान ठेवणे आणि आपली प्रतिकारशक्ती उत्तम ठेवणे हेच उपाय आहेत. आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण हे साध्य करू शकतो.
आयुर्वेदात सांगितलेल्या दिनचर्या व ऋतुचर्या यातील आहार व विहार सांभाळल्याने शरीरातील रोगांना सामोरे जाण्याची ताकद वाढते. आयुर्वेदात सांगितलेल्या वनस्पती या नैसर्गिक असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात आणि त्याने शरीर सुदृढ राहते.
आयुर्वेदाप्रमाणे शरीराचे बल वाढवण्यासाठी चांगला पोषणात्मक आहार, शांत झोप आणि योग्य तेवढाच व्यायाम करायला हवा. आयुर्वेदातील ग्रंथांमध्ये काही विशेष वनस्पतींनी युक्त औषधे ज्यांना रसायन असे सुद्धा म्हणतात; त्यांचा पण नित्य वापर करायला सांगितले आहे. अशा औषधांनी Infections लांब ठेवता येतात. या रसायनांचा उपयोग मानसिक स्वास्थ्य वाढवण्यासाठी, आकलनशक्ती व Memory वाढवण्यासाठी, वार्धक्य पुढे ढकलण्यासाठी सुद्धा होतो.
सध्याच्या परिस्थितीत अशा रसायन काम करणाऱ्या वनस्पतींचा आपले सर्वांगीण बळ वाढवण्यासाठी उपयोग करून घेतला पाहिजे. जर मानसिक ताणाने किंवा दीर्घकालीन आजारांनी आपली शारीरिक ताकद कमी झाली असेल तर ती अशा वनस्पतींमुळे दुरुस्त करता येते. श्वसनसंस्थेची नैसर्गिकरित्या ताकद वाढवण्यासाठीसुद्धा या वनस्पतींचा उपयोग करता येतो.
अशा प्रकारच्या सर्व वनस्पतींचे एकत्रीकरण होते ते च्यवनप्राश या रसायन औषधामध्ये. त्यामुळे या वर्षीच्या थंडीच्या सीझनमध्ये च्यवनप्राश सकाळी उठल्या उठल्या घेतलाच पाहिजे. जर स्वास्थ्य टिकवायला हवं असेल तर योग्य पद्धतीने केलेला आणि सर्व ग्रंथोक्त वनस्पतींयुक्त च्यवनप्राशला पर्याय नाही. असाच ग्रंथोक्त च्यवनप्राश आम्ही क्लिनिक मध्ये उपलब्ध केला आहे. तुम्ही तो Online order करून सुद्धा मागू शकता.
सर्वांना आयुर्वेद दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !
सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः |
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ||
डॉ. मधुरा भिडे
8380016116/119
www.recovalife.com
No Comments