PCOD

The Recova Thought

PCOD

तुम्हाला चेहऱ्यावर Pimples आहेत का ? त्याबरोबर पाळी/Periods अनियमित आहे का ? वजन वाढतंय का ? Depression येतंय का ? गर्भ धारणेस अडथळा येतोय का ? मग तुम्हाला PCOD हा आजार असू शकतो.

हा आजार स्त्री जेव्हा गर्भ धारण क्षम होते तेव्हा त्या काळात होतो. Modern science च्या दृष्टीने हा आजार Hormones च्या बिघाडाने होतो. या आजाराने बीजाशय च्या कामात अडथळा येतो त्याचबरोबर स्त्री चे आरोग्य बिघडू शकते.

PCOD या आजाराचे निदान जेवढे लवकर होऊन त्यावर योग्य उपचार होतील तेवढा इतर त्रास कमी होतो. म्हणजे सुरुवात फक्त पाळी अनियमित होते/रक्तस्त्राव कमी-अधिक प्रमाणात होणे या लक्षणांनी होते. परंतु याकडे खूप वेळा स्त्रिया दुर्लक्ष करतात. जेव्हा वजन अतिप्रमाणात वाढणे, Pimples ने चेहरा खराब दिसणे अशी लक्षणे दिसतात त्यानंतरच याकडे लक्ष दिले जाते.

तसेच PCOD चे उपचार वेळीच केले नाही तर पुढील आयुष्यात डायबिटीस, स्थौल्य, थायरॉईड, उच्च रक्तदाब असे मोठमोठे आजार मागे लागतात. तसेच या आजाराची साधारण कारणे म्हणजे जीवनशैलीतील बदल – बाहेरचे पदार्थ अतिप्रमाणात खाणे, व्यायामाचा अभाव, झोपेच्या अनियमित वेळा इ. त्यामुळे या आजाराची चिकित्सा करताना या कारणांचे परिमार्जन केले की लवकर फायदा होताना दिसून येतो. अर्थात औषधोपचारांची गरज असतेच.

आयुर्वेद दृष्ट्या हा आजार रक्तधातू व वाताशी संबंधित आहे. आयुर्वेदातील औषधे व पंचकर्माने खूप चांगले results बघायला मिळतात. पंचकर्मामध्ये ‘बस्ति’ चा विशेष उपयोग दिसून येतो. कारण बस्तिने वाताचे शमन होते. थोडा फार जीवनशैली मध्ये आणि आहारातील काही पथ्य केल्यास हा आजार पूर्ण बरा करता येतो. जेवढ्या लवकर या आजाराचे dignosis होते तेवढ्या लवकर हा आजार दुरुस्त करता येणं शक्य असते.

हल्ली च्या काळात बघितलं जातं की लहान मुलींना सुद्धा हा आजार होतो. अगदी १०-१२ वर्षाच्या मुलीना हा आजार होतो. परदेशातील trend मध्ये O.C. pills घेणे हे अगदी सामान्य समजलं जातं पण त्याचे दुष्परिणाम जे होतात ते दुरुस्त करणं फार कठीण असते. आणि हाच trend आता भारतात सुद्धा बघायला मिळतोय. या पासून आपल्याला लांब राहायचं असेल तर आयुर्वेदाकडे वळायला हवं.

– डॉ. मधुरा भिडे

Madhura Bhide
madhura@recovalife.com
No Comments

Post A Comment