केस आणि ???

केस आणि ???

केस गळणं ही आता एक खूप सामान्य समस्या झाली आहे. पण त्याचबरोबर केसांना खूप महत्त्व पण आलं आहे. केसांसाठी अनेक नवीन-नवीन प्रसाधने वाढत चाललेली आहेत. हल्ली तर मुलं पण केस वाढवायला लागली आहेत. Fashionable/Modern असं दिसायला हवं असेल तर वाढलेले केस आणि दाढी दोन्ही असावी लागते. म्हणून दाढीच्या केसांच्या सौंदर्यासाठी देखील अनेक Cosmetics बाजारात मिळू लागली आहेत. या केसांचा Original पोत चांगला नसेल तर एवढी महाग Cosmetics/सौंदर्य प्रसाधने वापरून तरी काय होणार?

केसांचा पोत चांगला करण्यासाठी आपला दिवसभराचा आहार आणि आपलं दिवसभराचं routine महत्त्वाचे असते. दिवसभर कधीही आणि काहीही अरबट चरबट खाऊन केस टिकत नाहीत. कितीही वाजता झोपायचं, कितीही वाजता उठायचं, जागरणं करायची, कधी मनात येईल तेव्हा व्यायाम करायचा, कधी मनात येईल त्यावेळेस जेवायचं असं सगळं करून केसच काय बाकी शरीराचं आरोग्य पण धोक्यात येईल. थोडी शिस्त हवीच. आहारातील आणि दिवस-रात्रीच्या routine मध्ये सुद्धा.

आज आपल्याला अनेक Tests बाजारातून सहज करून मिळतात. पण त्यांच्यावर पूर्ण अवलंबून राहून चालत नाही. Tests चे reports normal आले म्हणजे आपण कसेही खायला-प्यायला आणि वागायला मुक्त आहोत असा अर्थ होत नाही. ज्यावेळेस आजाराचे निदान होते तेव्हा आपले आचरण बदलून त्याचा फायदा व्हायला खूप वेळ जातो आणि मग त्या गोष्टींचे आचरण करणं अवघड होऊन जाते.

हल्ली वेगवेगळ्या ॲप वरून आपल्याला जे पाहिजे ते आणि कोणत्याही वेळेस खायचे पदार्थ मागवता येतात. यात आताची तरुण पिढी निष्णात आहेच. पण असे हे चमचमीत तिखट मिठाचे पदार्थ खाऊन आणि तेसुद्धा विचित्र वेळेस खाऊन आरोग्याचे रक्षण म्हणजेच केसांचे रक्षण कसे होणार?

आयुर्वेदात असे सांगितले की अतिलवण रसात्मक पदार्थ (खारट) खाण्याने खालित्य  (टक्कल) नावाचा आजार होतो. केस (अकाली) पांढरे होतात. हल्ली तर फॅशन म्हणून केस मुद्दाम पांढरे वगैरे करून घेतात म्हणे ….

गमतीचा भाग सोडला तर असं दिसून येतं की अगदी आठ दहा वर्षांच्या मुला मुलींचे केस पण पांढरे व्हायला लागले आहेत. अर्थात त्यात गर्भिणी असताना त्या आईच्या सुद्धा आहारात काही चुका झाल्या असतीलच.

हल्ली अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मीठांचा वापर आपल्या आहारात होत असतो. पदार्थ साठवायचा असेल तर वेगळे मीठ वापरतात, बेकरीच्या सगळ्या पदार्थांमध्ये तर दूध आणि क्रीम घालतात आणि त्यात मीठसुद्धा घालतात. लहान मुलांनी फळं खावी म्हणून त्यांना मीठ लावून खाण्याची सवय लावतात. अनेक देशांचे वेगवेगळे मीठ आपल्याकडे मिळायला लागलेली आहेत. आता ते सगळे पचवण्याचे सामर्थ्य आपल्या शरीरात आहे का ? आपल्या genes मध्ये आहे का ती ताकद ? केलाय का या सगळ्यांचा विचार ?? मग केस आणि या सगळ्यांचा विचार व्हायला हवा ना ?

डॉ.मधुरा भिडे

8380016116

रिकोव्हा लाईफ क्लिनिक्स

Madhura Bhide
atul@recovalife.com
No Comments

Post A Comment