How to deal with Anxiety & Stress ?

How to deal with Anxiety & Stress ?

हल्ली चिंता, काळजी कोणाला नसते. आजकालच्या धावपळीच्या काळात सतत भीती, चिंता, काळजी अशा भावनांनी आपल्या भोवती एक घेराव घातलेला आहे. आणि त्यामुळे आपण anxiety चे शिकार होतो. काहींना relationship सांभाळताना काळजी;  तर काहीना competition ची भीती, कामावर वेळेत पोचण्याची घाई, घरी आल्यावर बायकांना स्वयंपाक करण्याचे tension, अति प्रवासाने त्रस्त इ. अशा अनेक कारणांनी मानसिक व्यथा वाढत असतात.

आणि अचानक anxiety नावाचा आजार सुद्धा झालेला लक्षात येतो. सतत अशा भावनांकडे दुर्लक्ष केल्याने दुःख वाढत जाते. कधी कधी नैराश्य पण येतं आणि anxiety नावाचा आजार सुरु होतो आणि त्यामुळे सतत भीती वाटत राहते. त्याचबरोबर इतरही अनेक लक्षणे दिसून येतात. जसे मळमळ, Acidity, छातीत धडधड होणे कारण नसताना श्वासोच्छ्वासाची गती वाढणे, नीट झोप न लागणे इ.

म्हणून अतिविचार करणे चुकीचे ठरत जाते. परिणाम म्हणून चिडचिड वाढते, लक्ष लागत नाही, झोपेच्या तक्रारी सुरु होतात, थकवा येणं. अशी लक्षणं दिसतात. या anxiety मुळे पुढचे पुढचे आजार होण्याची भीती असते. ते होऊ नयेत म्हणून आधीपासून या सगळ्याकडे लक्ष दिले पाहिजे.

मेडिटेशन, औषधे आणि पंचकर्म या त्रिसूत्री चिकित्सेने मन:स्वास्थ्य साधता येते. कसे ते पुढच्या भागात …..

डॉ. मधुरा भिडे
रिकोव्हा लाईफ क्लिनिक्स
८३८००१६११६

Madhura Bhide
atul@recovalife.com
No Comments

Post A Comment