
30 Jan गर्भसंस्कार कशासाठी ?
क्लिनिक मध्ये सुवर्णप्राशन संस्कार करत असताना असे लक्षात येते की बरेच पालक आपल्या लहान मुलांच्या आरोग्याबद्दल चिंतीत आहेत. हल्ली दहाव्या-बाराव्या वर्षीच लहान मुला-मुलींचे केस पांढरे होताना दिसतात. चष्मा किंवा दृष्टिदोष लहान वयातच येतो. मुलींचे वजन वाढते. मासिक पाळी तर नवव्या-दहाव्या वर्षीच येते. उंची वाढत नाही. अभ्यासात लक्ष लागत नाही. झोप नीट लागत नाही. नीट जेवत नाही या व अशा अनेक तक्रारी पालक घेऊन येतात.
अशा वेळेस हे लक्षात येते की या लहान मुलांना गर्भावस्थेत असतानाच काही गोष्टी सांभाळल्या गेल्या असत्या किंवा मातेने व पित्याने गर्भधारणेपूर्वी स्वतःच्या शरीराचे शोधन करून घेतले असते तर ही वेळ त्यांच्यावर आलीच नसती. तसेच गर्भधारणे आधी स्त्रीने आणि पुरुषाने मनाने तयार व्हायला हवं की त्यांना गर्भ राहायला हवा आहे. कारण लग्नानंतर अनेक वर्षे मूल होऊ न देण्यासाठी प्रयत्न असतात. मग अचानकपणे घरातल्या संबंधित व्यक्ती, नातेवाईकांच्या आग्रहापोटी मूल हवेसे वाटते. हा शारीरिक आणि मानसिक बदल इतक्या सहज होत नाही हे ही लक्षात घ्यायला हवे.
तसेच सध्या रासायनिक खतांचा अतिवापर, preservative असलेले अन्न यांचा वापर अति होतो आहे. करिअरच्या मागे धावताना खाण्याच्या, झोपण्याच्या अनियमित वेळा यामुळे जीवनशैलीतील बदलामुळे होणारे आजार माता-पिता होण्याआधीच मागे लागताना दिसत आहेत. म्हणून मातेने व पित्याने गर्भधारणेपूर्वी स्वतःच्या शरीराचे शोधन केले पाहिजे.
म्हणून आयुर्वेद शास्त्राचा अभिमान वाटतो की गर्भसंस्कार सारखा विषय आयुर्वेदाने किती विस्तृत सांगितला आहे. ही सगळी माहिती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून हा लेखप्रपंच.
सशक्त प्रजा आज राष्ट्राची गरज आहे. सशक्त म्हणजे शारीरिक आणि मानसिक दोन्ही बाबतीत म्हणणे संयुक्तिक आहे. सशक्त शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे. तोच अर्थ समाजासमोर आणणं आणि त्यासाठी लागणारे उपचार करणे आयुर्वेदाने शक्य आहे. आयुर्वेदाकडे या सशक्त प्रजा निर्माण करण्याची गुरुकिल्ली आहे. इतके सगळे उपाय असताना ते जनसामान्यांपर्यंत पोहोचवता यावे अशी सदिच्छा घेऊन लवकरच आम्ही क्लिनिक्स मध्ये विशेष मार्गदर्शन सत्रे सुरू करणार आहोत.
डॉ. मधुरा अ. भिडे.
(एम.डी आयुर्वेद)
www.recovalife.com
8380016116
No Comments