
29 Jul दंतमंजन
लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत हल्ली सर्वांनाच दातांच्या अनेक समस्या भेडसावतायत; याचे कारणही हल्लीचे खाणे, अति प्रमाणात गोड पदार्थ, चॉकलेट्स तसेच झोपताना ब्रश न करणे इत्यादी अनेक आहेत.
नक्की काय चुकते दातांचे आरोग्य टिकवून ठेवण्यात? वेगवेगळ्या टूथपेस्ट वापरून आपण सकाळी ब्रश करतोच. पण तेवढेच पुरेसे नाही तर रात्री झोपताना दंतमंजन ने दात घासणे व हिरड्यांना मसाज करणे गरजेचे आहे. हिरड्या जर बळकट व Healthy असतील तर दातांचे आरोग्य चांगले राहते. म्हणून हिरड्यांना मसाज करणे गरजेचे असते. आयुर्वेदात देखील दंतधावन (दातांची स्वच्छता) असा दिनचर्या मध्ये एक विधी सांगितला आहे. दंतधावनासाठी आयुर्वेदानुसार कटू, तिक्त, कषाय (तिखट, कडू, तुरट) या रसाच्या वनस्पतींचा वापर करण्यास सांगितले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे मुखामध्ये आयुर्वेदानुसार कफाचे स्थान सांगितले आहे. ज्यामुळे अतिरिक्त व विकृत कफ कमी करण्यास दंतधावन उपयुक्त ठरते. आणि कफ प्राकृत राहिल्यावर दात, हिरड्या, जीभ हेल्दी राहण्यास मदत होते.
दंतमंजन चा वापर केल्याने ज्यांना वारंवार तोंड येणे ही समस्या असते त्यांना देखील यामधील त्रिफळा चूर्णाने ही समस्या कमी होताना दिसून येते. कारण त्रिफळा चूर्ण व्रणरोपणाचे (जखम भरून आणण्याचे) काम करते. ज्यांना जास्त प्रमाणात तोंडात लाळ येणे आणि त्यामुळे मुखदुर्गंधी उत्पन्न होत असते अशा स्थितीत दंतमंजन चा नियमित वापर केल्यास फायदा दिसून येतो.
दातांमध्ये जेव्हा काही कारणास्तव म्हणजे वेदना होतात, त्यावेळी देखील काही वेळा दंतमंजन चा फायदा निश्चित दिसून येतो.
म्हणून दात स्वच्छ करण्यासाठी रोज दंतमंजनचा वापर करावा आणि आपल्या दातांचे आरोग्य टिकवून ठेवावे.
[दंतमंजन हे योग्य घटकांनी युक्त आणि योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. ]
डॉ. मधुरा भिडे
8380016116
www.recovalife.com
राजू पवार
Posted at 10:43h, 29 Julyदंतमंजन पाहिजे
Madhura Bhide
Posted at 09:35h, 18 AugustYou can order online.
http://www.dynamicremedies.in