02 Aug पंचकर्म का करायचे ?
वर्षानुवर्षे आपण आपल्या मनात येईल तसं वागत असतो. वाटेल ते खात असतो. सणासुदीच्या निमित्ताने किंवा लग्न समारंभात, किंवा कुठंतरी बाहेर फिरायला गेल्याचे निमित्ताने वाट्टेल ते तेलकट, गोड, चमचमीत पदार्थ खात पित असतो. त्यात खाण्यापिण्याच्या वेळांचे ही भान नसते. व्यायाम तर नाहीच- कधी आळशीपणा मुळे तर कधी वेळ नाही...