सूर्यनमस्काराचे फायदे

सूर्यनमस्काराचे फायदे

सूर्यनमस्काराचे फायदे

  • मन प्रसन्न राहते व उत्साह वाढतो. झोप चांगली लागते.
  • शरीर लवचिक, स्थिर व दृढ होते व दीर्घायुष्य प्राप्त होते. लवचिकता वाढल्याने तारुण्य टिकून राहते. केस व त्वचेचे आरोग्य टिकून राहते.
  • पाठीचा मणका व स्नायू मजबूत होतात.
  • वजन नियंत्रित राहते व प्रामुख्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.
  • रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते. जठराग्नी प्रदीप्त होऊन चांगली भूक लागते व अन्नपचनशक्ती सुधारते. हृदयरोगासारखे आजार लांब ठेवता येतात.
  • बीजमंत्रासाहित सूर्यनमस्कार घातल्याने व्यायामही होतो व सूर्याची उपासनाहीं होते. सबीज मंत्रोच्चारण केल्याने यकृत, प्लीहा, आमाशय, कंठ, तालू, हृदय या अवयवांच्या कार्यात सुधारणा होते.
  • डायबेटिस, थायरॉईड या सारख्या आजारांमध्ये अतिशय उपयुक्त.
  • सूर्यनमस्कारांच्या नियमित सरावाने दोष, धातू व मल हे घटक समप्रमाणात राहिल्याने व्याधी प्रतिबंध होतो.

 

 सूर्यनमस्कारासंबंधी सामान्य नियमावली

  • शक्यतो सकाळी व पूर्वेकडे तोंड करून नमस्कार घालावेत.
  • नमस्कार रिकाम्या पोटी घालावेत.
  • नमस्कार घालताना कपडे सैल असावेत.
  • मासिक पाळीच्या काळात, गर्भावस्थेत तसेच प्रसूतीनंतर तीन महिने सूर्यनमस्कार घालू नयेत.
  • सूर्यनमस्कारानंतर न चुकता श्वासोच्छवास नियमित येईपर्यंत शवासन करावे.

 

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर वर कॉल करा.

www.recovalife.com

8380016116

Madhura Bhide
atul@recovalife.com
3 Comments
  • Amriita S Bokil
    Posted at 07:49h, 26 December Reply

    👌👌khup upayukta mahiti

  • Deepak Dasharath Kokne
    Posted at 12:15h, 31 December Reply

    Madam
    Humbly request you to start coaching classes for the same. You must charge for the same.
    Regards,
    Deepak Kokne

Post A Comment