पावसाळ्यातील काळजी कशी घ्यायची ?

पावसाळ्यातील काळजी कशी घ्यायची ?

Covid-19 ने अजून आपला पाठलाग सोडलेला नाही. त्यात आता पावसाळा सीझन. म्हणजे आजारपण वाढण्यासाठी आणखीन एक कारण. परवाच क्लिनिक मधून घरी जाताना एका बस स्टॉप वर वाचलं ‘घाबरून जाऊ नका, जागरुक व्हा.’ म्हणून हा लेख लिहायला घेतला.

थोडीफार का होईना सगळ्यांना, अगदी लहान मुलांना देखील या covid-19 ची भीती बसली आहे. पण आपण जर योग्य काळजी घेतली तर या आजाराला तोंड द्यायची क्षमता वाढवू शकतो, हे नक्की. आणि हा आजार झालाच तर तो सौम्य स्वरूपाचा राहील, त्यातून लवकर बरे होता येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर भीती घालवायची असेल तर ज्ञान प्रकाशाने अज्ञानाचा अंधार काढून टाकायला हवा. हा covid-19 Virus नाकातून, तोंडातून व डोळ्यातून शरीरात जातो. जर Mask चा योग्य वापर केला तर हा मार्ग आपण अडवू शकतो. तसेच डोळ्यांसाठी ज्यांना चष्मा असेल त्यांनी चष्मा व नसेल तर त्यांनी फेस शील्ड वापरले तर हा मार्ग अडवता येतो. हा जो व्हायरस आहे तो घशात आपलं घर करतो आणि मग त्याची प्रतिक्रिया म्हणून ताप येतो. तर आता आपला हा प्रयत्न असला पाहिजे की आपले नाक, घसा आणि डोळे स्वच्छ ठेवणे. तर त्यासाठी रोज सहज होईल इतपत गरम पाणी पिणे. त्याचबरोबर तोंडाचे, दाताचे व हिरड्यांचे इतर आजार सुद्धा होऊ न देणे. अशा साठी आयुर्वेदाने दिनचर्येमध्ये काही उपक्रम सांगून ठेवले आहेत.

जसे दंतधावन आणि कवल-गंडूष विधी. सोप्या भाषेत दात, हिरड्या आणि जीभ रोज सकाळी घासणे ते पण कडवट चवीच्या काडीने किंवा पावडरने. सध्या काडीने दात घासणे Practically शक्य नसल्याने त्याच्या चूर्णापासून तयार केलेल्या दंतमंजन चा वापर करावा. माझ्या पेशंट साठी उत्तम प्रतीच्या दंतमंजनची सोय क्लिनिक मध्ये केलेली आहे. त्यानंतर चूळ भरणे किंवा गुळण्या करणे. यासाठी कोमट पाणी किंवा वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळे काढे किंवा तेलं पण आयुर्वेदात सांगितली आहेत. हाच काढा आपल्याला जर तयार मिळाला तर ? त्यासाठी मी क्लिनिकमध्ये माझ्या पेशंट साठी माऊथ वॉश ची सोय केली आहे. तसेच दोन वेळा डोळे नॉर्मल पाण्याने स्वच्छ धुणे आणि त्रिफळा चूर्ण घेणे हेही डोळ्यांच्या रक्षणासाठी फायद्याचे ठरते. हे सर्व उपचार अगदी स्वस्तातले आणि सोपे आहेत. आपल्याला आजारांनी ग्रस्त व्हायचे नसेल तर एवढे तरी काळजी घेतली पाहिजे ना !

काही प्रश्न असतील तर नक्की विचारा.

जाता जाता एकदा परत Revision –

– रोज घराबाहेर पडताना मास्क लावणे.
– त्या मास्कला सारखा हात न लावणे.
– दिवसातून 2-3 वेळा सहन होईल इतपत गरम पाणी पिणे.
– दिवसातून 2 वेळा दंतमंजन आणि माउथवॉश.

धन्यवाद.

डॉ. मधुरा भिडे
8380016116
www.recovalife.com

Madhura Bhide
atul@recovalife.com
4 Comments
  • Jyothi Shetty
    Posted at 11:57h, 07 July Reply

    Very useful post.. Thanks Dr. Madhura

  • Deepak Dasharath Kokne
    Posted at 17:17h, 07 July Reply

    I am consuming your Chavanprash & Triphala, both the products found very useful for my health.

Post A Comment